ओतूरमध्ये बंद घर फोडून पावणेबारा लाखांचा ऐवज लांबवला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
ओतूर (प्रतिनिधी):
ओतूर (ता. जुन्नर) येथील चैतन्य रोड परिसरात बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात बातमी:
फिर्यादी: डॉ. कमलेश विजय घोलप (वय ५६, रा. चैतन्य रोड, ओतूर).
घटना: १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान डॉ. घोलप कुटुंबियांसह कामानिमित्त पुणे येथे गेले असता, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ऐवज चोरून नेला.
चोरीला गेलेला माल:
सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, गोफ, हिऱ्याचे टॉप्स, नाणे)
चांदीची भांडी (तांब्या, ताट, समई, अत्तरदाणी, वाट्या, पेणजण)
३,००,०००/- रुपये रोख रक्कम
एकूण किंमत: ₹११,८७,५००/-
पोलीस कारवाई: ओतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(१) अन्वये गु. र. नं. २६५/२०२६ नुसार गुन्हा दाखल.
तपास अधिकारी: सपोनि बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जाधव पुढील तपास करत आहेत.