मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

चाकण तळेगाव रोड व महाळुंगे, महिंद्रा कंपनी रोड वर गाड्यांची पार्ककिंग केल्यास वाहनांवर कारवाई तसेच संबंधित वाहन चालकांचे लायसन होणार निलंबन ..

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले

मंगळवार दिनांक 06 .10 .2026 रोजी सकाळी 09.45 ते 12.05 पर्यंत आरटीओचे अधिकारी श्री छोटे साहेब, श्री मोरे साहेब , महाळुंगे वाहतूक विभागाचे P I श्री. वाघमारे साहेब आणि यांचे सहकारी यांच्यासह चाकण तळेगाव रोड व महाळुंगे येथे पार्किंग नंबर एक ,पार्किंग नंबर दोन ,पार्किंग नंबर तीन या ठिकाणी भेट दिली तसेच महिंद्रा कंपनीच्या समोरील ट्रान्सपोर्टर व ड्रायव्हर यांच्याशी आज रोजी मीटिंग घेऊन संवाद साधला व त्यांना रोडवर पार्किंग न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. तसेच सदर त्या ठिकाणचे पार्किंगचे लोकेशन्स देऊन आपण सुद्धा जास्तीत जास्त चालकांना हे लोकेशन्स शेअर करावे व सदरची पार्किंग ही फ्री आहे. याबाबत आपल्या ग्रुप वर मेसेज टाकून जास्तीत जास्त प्रसारित करावे. तसेच विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांवर व रोडवर लागणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभाग व महाळुंगे वाहतूक विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे सदरच्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल व संबंधित वाहन चालकांचे लायसन निलंबन करण्यात येईल. तसेच वरील मुद्द्यांवर आणखीन काही मार्ग काढता येईल का याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.