मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,संगमनेर शाखेच्या वतीने पत्रकारांना किराणा बाजार व ओळखपत्राचे वाटप.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,संगमनेर शाखेच्या वतीने पत्रकारांना किराणा बाजार व ओळखपत्राचे वाटप.

संगमनेर खुर्द :
संपूर्ण महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, कार्यरत असलेले सर्वात मोठी पत्रकारांची संघटना या पत्रकार संघटनेच्या वतीने वर्षभर विविध समाज उपयोगी व सामाजिक उपक्रम राबवले जातात, व पत्रकारांचे हित जोपासले जाते . महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे, नेहमीच पत्रकारांच्या सुखात दुःखात सहभागी होऊन होतात. या वर्षी दीपावलीच्या निमित्ताने राज्य पत्रकार संघ, मुंबई, संगमनेर शाखेच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पत्रकारांसाठी दिवाळी भेट म्हणून किराणा किट व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
पत्रकारांच्या सुखात दुःखात नेहमीच अग्रेसर राहून राज्य पत्रकार संघटनेने अनेक सामाजिक कामे केली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये पत्रकारांसाठी पाच लाखाचा विमा, बाळशास्त्री जांभेकर जयंती, सर्व पत्रकारांचा सन्मान करून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.अधिवेशन काळात सर्व पत्रकारांना बॅग,डायरी, वही, पेन, हेल्मेट इत्यादी साहित्य वाटप करून सन्मानित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, संगणमेर शाखेच्या वतीने व डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवड समितीचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद चत्तर यांच्या संघटनेतील सर्व पत्रकारांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी पत्रकारांना दीपावलीच्या शुभेच्छा देत, आपल्या सर्वांना दीपावली सुख समृद्धी आनंदाची आणि आरोग्यमय जावो ही सदिच्छा व्यक्त करत संघटना यापुढेही पत्रकारांसाठी पत्रकारांच्या हितासाठी जोमाने काम करेल असे सांगितले. त्यानंतर जिल्हा निवड समितीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी, पत्रकारांनी एकजुटीने काम करावे व यापुढील काळात पत्रकाराने एकमेकांशी संवाद वाढवून संघटना मजबूत करावी अशी विनंती करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, उत्तर नगर जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, संघटनेचे जेष्ठ पत्रकार विकास वाव्हाळ, दैनिक सकाळचे पत्रकार उपसंपादक राजू नरवडे, दैनिक युवा वार्ताचे उपसंपादक संजय अहिरे, दैनिक सार्वमत चे कार्यालय उपसंपादक महेश पगारे,
दैनिक पुण्यनगरीची उपसंपादक आनंद गायकवाड, सचिन जंत्रे, ज्येष्ठ पत्रकार संजय साबळे, भारत पडवळ, बाबासाहेब कडू, नितीन कोकणे, दैनिक भास्कर चे पत्रकार भारत रेघाटे, नामदेव बागडे, आदीं पत्रकार उपस्थित होते.