*हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनतर्फे १३० कातकरी कुटुंबांना दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप*
डेहने: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या 'हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर' च्या वतीने खेड तालुक्यातील दुर्गम पश्चिम पट्ट्यातील आदिवासी व कातकरी कुटुंबांना दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप हा उपक्रम गेली ७ वर्षे राबविण्यात येत आहे.
दिवाळी फराळ व कपडे वाटप या उपक्रमांतर्गत डेहने येथील कातकरी वस्ती, शिरगांव येथील कातकरी वस्ती परिसरातील सुमारे १३० कातकरी बंधू-भगिनी कुटुंबाला दिवाळीचा आनंद मिळवून देण्यात आला. या सामाजिक उपक्रमासाठी फाउंडेशनच्या सर्व संचालकांनी वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली. तसेच राजगुरुनगर शहरातील दानशूर व्यक्ती व देणगीदारांकडून गोळा झालेल्या निधीतून व वस्तूंमधून ही मदत सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी स्कोडा, व्होल्स वॅगन कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, उपाध्यक्ष नाझनीन शेख, सचिव अमर टाटीया, संचालक ॲड. मनिषा पवळे, संतोष सांडभोर, सुनिल वाळुंज, दिलीप होले, राहुल मलघे, आकाश बोंबले, संतोष पाचारणे उपस्थित होते.